Tuesday, March 8, 2011

कमिंग 'सून' - लिझ हर्ली


हॉलिवूडच्या दुसऱ्या फळीतल्या नट्यांपैकी एक असलेल्या एलिझाबेथ जेन हर्ली ऊर्फ लिझ हर्लीशी आपला तसा काहीच वास्ता नाही. तरीही ती आज भारतातही गाजते आहे... कारण आपल्याशी आज तिचा वास्ता नसला तरी फेब्रुवारीतच तो येणार आहे. ती मुंबईत , शादी का फेमस लाल जोडा पहनून अरुण नायर नामक (अर्धजर्मन) भारतीय अब्जाधीशाबरोबर सात फेरे घेणार आहे... नंतर इंग्लंडला जाऊन प्रभू येशूसमोर या लग्नावर शिक्कामोर्तब करणार आहे... थोडक्यात ती ' कमिंग सून ' आहे भारताची.


तिच्याशी आपला वास्ता काय ?
खरं तर काहीच नाही.

ती हॉलिवुडची नटी आहे. असेना का! तिच्यासारख्या छप्पन्न टिकल्या आज तिथे आहेत. ती काही मरलिन मन्रो नाही , लिझ टेलर नाही , कॅथरिन हेपबर्न नाही , बर्गमन नाही किंवा ज्युलिया रॉबर्ट्स नाही. तिच्यासाठी पाहावा(च) असा एकही सिनेमा , 17 वर्षांच्या कारकिदीर्त तिच्या नावावर नाही... तशी मदनिका वगैरेंत गणना होऊन अखेरी पोस्टररूपे उरण्याइतकी ' संपदा ' तिच्याकडे आहे , तिचे प्रदर्शनही तिच्या सिनेमांत आणि वॉलपेपरांच्या साइटींवर सदोदित घडत असतंच. पण , पिन अप्सचाच विचार करायचा तर समान्था फॉक्सही हिला भारी पडावी...

... तरीही ती चचेर्त आहे. जिथे तिचा काहीएक वास्ता नाही अशा भारतातही चचेर्त आहे आणि यातही नवल काहीच नाही.

एलिझाबेथ जेन हलीर्ला भलत्याच कारणांसाठी प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची सवय आहे...

... आणि आपल्याशी आज तिचा वास्ता नसला तरी फेब्रुवारीतच तो येणार आहे. ती मुंबईत , शादी का फेमस लाल जोडा पहनून अरुण नायर नामक (अर्धजर्मन) भारतीय अब्जाधीशाबरोबर सात फेरे घेणार आहे... नंतर इंग्लंडला जाऊन प्रभू येशूसमोर या लग्नावर शिक्कामोर्तब करणार आहे... थोडक्यात ती ' कमिंग सून ' आहे भारताची.

त्यामुळे , सासरच्या मंडळींच्या कर्तव्यबुद्धीनं या भावी सुनेची माहिती करून घ्यायलाच हवी. लिझ या नावानं सुपरिचित असलेल्या एलिझाबेथ हलीर्चा जन्म इंग्लंडमधल्या हॅम्पशायर परगण्यात झाला. लष्करी अधिकारी वडील आणि शिक्षिका आई यांची ही मुलगी लहानपणी बरीच गुणी होती. वयाच्या 12 व्या वषीर् ती शास्त्रशुद्ध बॅले नर्तन शिकली. नंतर लंडनच्या स्टुडिओ संेटरमधून अभिनय आणि नृत्याची पदवीही घेतली होती तिनं. शिवाय समाजशास्त्रात ए ग्रेड मिळवणारी विद्याथिर्नी होती ती.

आता तिच्या या ' स्कॉलरली ' शैक्षणिक कारकिदीर्ची , यशाची चर्चा व्हावी की नाही ? पण , तेव्हा चर्चा झाली ती तिच्या वेगळ्याच ' उपक्रमां ' ची. रंगवलेल्या केसांची टोकेरी केशभूषा करून , नाकात नथ घालून , सतत सिग्रेटी फुंकत फिरणाऱ्या पंक टोळ्यांमधली एक भिडू म्हणूनच ती मशहूर होती.

या सगळ्या ' एक्स्ट्राकरिक्युलर अॅक्टिव्हिटीं ' मधून वेळात वेळ काढून तिनं टीव्हीवर काही सिनेमे , काही मालिका केल्या. या काळात तिला तिचा प्रदीर्घकाळचा बॉयफ्रेंड भेटला... ह्यू ग्रान्ट. ' एरिआ ' या सिनेमातून तिचं इंग्लंडच्या रूपेरी पडद्यावर पदार्पण झालं तेव्हा ती 21 वर्षांची होती. ह्यूबरोबर तिनं बऱ्याच इंग्लिश सिनेमांमध्ये काम केलं , कधी बरं , कधी ठीक ; पण तिची ओळख लोकांना होती ती एक मॉडेल आणि ह्यू ग्रान्टची प्रेयसी म्हणूनच.

यथावकाश वेस्ली स्नाइप्सबरोबर ' पॅसेन्जर फिफ्टी सेवन ' या खरोखरीच थरारक असलेल्या थरारपटातून तिचं हॉलिवूडमध्ये आगमन झालं. पण हॉलिवूडनं तिची खरी दखल घेतली ती तीन वर्षांनी... तीही (तिच्या परंपरेप्रमाणे) भलत्याच कारणासाठी. 1997 साली आलेल्या ' फोर वेडिंग्ज अॅन्ड अ फ्यूनरल ' नं ह्यू ग्रान्ट आणि लिझ या दोघांनाही रातोरात प्रसिद्धीच्या शिखरांवर नेलं. ह्यूला त्याच्या बेहतरीन अदाकारीसाठी नावाजलं गेलं तर लिझ गाजली ती तिच्या एका ड्रेसमुळे. या सिनेमाच्या प्रीमियरला जाण्यासाठी लिझ व्हर्साचीच्या दुकानी डोकावली. पण त्यांच्याकडचे सगळे इव्हनिंग गाउन संपले होते. जे होते ते तिला परवडणारे नव्हते. शेवटी एका कोपऱ्यात पडलेला काळा गाउन तिला मिळाला. तिनं बाहेरून सेफ्टी पिना लावून तो परिधान केला आणि त्या ड्रेसनं जबरदस्त हलचल मचवली. तो प्रीमियर यादगार झाला तो लिझच्या त्या ड्रेसमुळे.

पुढे ह्यू एका मोटारीत डिव्हाइन ब्राउन नावाच्या वारांगनेबरोबर प्रेमचाळे करताना पकडला गेला. तेव्हा ती त्या अग्निदिव्यातही त्याच्याबरोबर राहिली. तरीही कुठेतरी झळ बसली होतीच. दोघे दुरावले.

नंतर भिरभिरत्या लिझचं नाव अनेकांशी जोडलं गेलं. स्टीव्ह (स्टीफन) बिंग या लेखक-निर्मात्याबरोबरचं प्रकरण मात्र सिरियस होतं. त्याच्यापासून तिला 2002 साली डेमियन चार्ल्स हलीर् या पुत्ररत्नाचीही प्राप्ती झाली. पण इथेही गाजला तो पितृत्वनिश्चितीचा खटला. मुलाचे बाप आपणच आहोत का , हे सिद्ध करण्यासाठी स्टीव्हनं डीएनए टेस्ट वगैरेपर्यंत मजल मारली. त्याचं पितृत्व सिद्ध झाल्यानंतर त्यानं मुलाचा खर्च उचलायची तयारी दर्शवली , पण संतप्त लिझनं त्याचा प्रस्ताव धुडकावून त्याला सणसणीत फुटाची गोळी दिली.

दरम्यानच्या काळात तिचे सिनेमे येत-जात होते. त्यातल्या त्यात तिला ओळख मिळाली ती गुप्तहेरपटांची अर्वाच्य नक्कल करणाऱ्या ऑस्टिन पॉवर्सपटांमधली वनेसा केन्सिंग्टनच्या भूमिकेत. ' बिडॅझल्ड ' मधली मादक ' सैतानीण ' ही गाजली तिची ; पण ' प्रिटी वुमन ' चा दुसरा भाग तिनं कसा नाकारला , ' गोल्डन आय ' या बाँडपटासाठी तिचा कसा विचार झाला , याच तिच्याविषयीच्या ' बातम्या ' होत्या...

... अशात तिला 37 वर्षांचा अरुण नायर हा बॉयफ्रेंड भेटला आणि ऐन छत्तिशीतली ही बया षोडषवर्षाच झाली. कॉलेजयुवकयुवतीप्रमाणे हे युगुल निरनिराळ्या सार्वजनिक (महत्त्वाच्या) स्थळांवर जाहीर प्रेमलीला करण्याचा हक्क बजावू लागलं , ' द सन ' वगैरे उठवळपत्रांना सछायाचित्र मजकूर पुरवू लागलं. नायरचं व्हॅलेन्टिना पेड्रोनी या इटालियन सुंदरीबरोबरचं लग्नही या भानगडीत मोडलं. तिनं भरपूर नखरे करून झटपट घटस्फोटाला रुकार दिला आणि लिझ-अरुण यांचा विधि व शास्त्रसंमतीने जाहीरपणे/ खासगीत मनसोक्त प्रेमालाप करण्याचा मार्ग खुला झाला...

... अरुणच्या आईवडिलांच्या आग्रहाखातर लिझ भारतात येऊन , हिंदू पद्धतीनं लग्न करणार आहे. नंतर ती भारतात राहणार आहे का ? येऊनजाऊन असणार आहे का ? वगैरे प्रश्ान् अजूनही अंतरपाटापलिकडेच आहेत...

एक नक्की , ती इथे राहिली तर चमकिल्या पुरवण्यांच्या पानतीनांची सोय झाली.

- तिथे राहिली तर काही फुटकळ सिनेमांची...

यापलिकडे फार मोठा फरक कुणालाच पडत नाही...

(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment