Wednesday, March 9, 2011

बेस्ट अॅक्टर


आमिर खानचा 'तारे जमीं पर' पाहणं हा अद्भुत अनुभव आहे... ...नेहमीचा व्यावसायिक मसाला नसलेला सिनेमा हाऊसफुल्ल. एरवी थिएटरात पोरंटोरं आली की शांतपणे सिनेमा पाहायला आलेल्या मोठ्यांच्या पोटात गोळा येतो. रडारड, गप्पा, हसणं आणि वैतागून 'सुसू'च्या फेऱ्या यांनी पोरं पार कातावून सोडतात. हा सिनेमा तर खास मुलांसाठी रेकमेण्ड केला जाणारा. साहजिकच बच्चेकंपनी भरपूर. पण, सिनेमा सुरू झाल्याक्षणापासून तो संपेपर्यंत पोरं एकदम सुतासारखी सरळ असतात. रडारडीच्या सिनेमाला बायकांबरोबर नाईलाजानं येणारी पुरुषमंडळी सिनेमा सुरू झाल्यावर सहसा टॉयलेटची आणि पॅसेजची वाट धरतात... टाइमपास करायला. पण, इथे सगळेच कसे खुचीर्ला चिकटल्यासारखे घट्ट. प्रेक्षकवृंदात गुर्जरबांधव लक्षणीय (आमिरवर त्यांचा महाराष्ट्रात बहिष्कार नाही वाटतं) तरी थिएटरात कलकल नाही, हेही आश्चर्यच.

हा सगळा पराक्रम पेलला गेला आहे दशीर्ल सफारी या चिमुरड्याच्या छोट्या खांद्यांवर. त्याचा ईशांत पहिल्या फ्रेमपासून पकड घेतो आणि ती अखेरपर्यंत घट्ट होत जाते. भूमिकेत शिरणं, पारदशीर् भावदर्शन, भूमिका जगणं वगैरे शब्दांचे बुडबुडे फोडण्यात हशील नाही. 'तारे जमीं पर'चा सगळा खेळ हा एक मुलगा एकहाती चालवतो... फॅण्टास्टिक! तो सिनेमाचा 'नायक' आहे... आमिर खानने त्याला श्रेयनामावलीत स्वत:च्या वरचं, पहिलं स्थान दिलंय आणि स्वत: इंर्टव्हलला एण्ट्री घेतलीये. (हे फार अवघड. स्वत:च्या सिनेमात सतत स्वत:वर कॅमेरा ठेवून स्वहस्ते तोंड लपवून फिरणाऱ्या मनोजकुमारला दुसऱ्याच्या सिनेमात तसं दाखवलं तर किती राग येतो? सुबुद्ध-विचारी नट असलेला कमलहासनही दिग्दर्शकाच्या भूमिकेत शिरल्यावर नट कमलहासनच्या प्रेमात पडतो आणि स्वत:भोवती कॅमेरा गरगरवत ठेवतो.)

असो! मुद्दा तो नाही. मुद्दा हा आहे की आमिरने दाखवलेला सुज्ञपणा इंडस्ट्री दाखवणार आहे का? असंख्य पुरस्कारांचा मौसम आता आला आहे. 'तारे जमीं पर'ला भरपूर मानांकनं असणार यात शंका नाही. पण, दशीर्लचा विचार काय म्हणून करणार? बेस्ट अॅक्टर की बेस्ट चाइल्ड आटिर्स्ट?

तो वयानं लहान आहे, हा त्याचा दोष आहे का?

त्यानं दाखवलेली अभिनयाची जाण अनेक 'अॅडल्ट' अभिनेत्यांमध्ये नाही. मग, त्याला 'चाइल्ड' म्हणून का नाकारताय? बेस्ट अॅक्टर (वय वषेर् १५ ते २५), बेस्ट अॅक्टर (वय वषेर् २५ ते ४०) अशा काही कॅटेगरीज असतात का?

अशा पुरस्कारांचे निकाल कसे लागतात, ते सर्वांना ठाऊक आहे. पुरस्कार ज्यांना मिळायचे त्यांना मिळतीलच. पण, निदान दशीर्लचं मानांकन 'बेस्ट अॅक्टर'च्या कॅटेगरीत करा.

व्हॉट से?

(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment