रामगोपाल वर्मा हा कुतुहल निर्माण करणारा दिग्दर्शक आहे.
सिनेमासृष्टीतले यशस्वी- अयशस्वी दिग्दर्शक सिनेमावर स्वत:चा शिक्का उमटवण्यासाठी स्वत:ची शैली, स्वत:चा `टच' यांचा हव्यास धरतात. रामगोपाल वर्मा मात्र सतत काहीतरी नवीन करत असतो. (कालांतरानं हीच त्याची `शैली ठरणार की काय?) कधी तो हलकाफुलका- इमोशनल `रंगीला' काढतो. कधी भेदक, हिंस्र `सत्या' काढतो. तर कधी भयभावनेचा तळ ढवळून काढणारा `कौन' बनवतो. वेगवेगळय़ा जातकुळीचे, पोताचे हे सिनेमे; पण विशिष्ट दर्जाचे. गंमत म्हणजे, आपण दर्जेदार सिनेमे काढतो, असा शिक्का बसण्याच्या भयाने की काय, तो अधेमधे `दौड`सारखी जबरदस्त पाटीही टाकाते.
विषयाचं, मांडणीचं नावीन्य हे रामगोपाल वर्माच्या सिनेमाचं व्यवच्छेदक लक्षण त्याच्या नव्या `मस्त'मध्येही पहिल्या छूट जाणवतं. श्रेयनामावलीतच त्याची काहीशी कारण परंपराही समजते. रामगोपाल त्याच्या एका सिनेमाचे लेखक, कलावंत (काही अपवाद वगळता) आणि तंत्रज्ञ सहसा पुढच्या सिनेमात `रिपीट' करत नाही. शिवाय, `हमखास वा नेहमीच्या यश्स्वी' मंडळींनाही फारसा थारा देत नाही. पटकथा- संवाद लेखक, छायालेखक, गीतगर, संगीतकार, नृत्यदिग्दर्शक, संकलक अशी सगळी टीमच बदलतो, त्यात नवोदिनांच भरणा करतो. `बनचुके' न झालेल्या, संधी मिळाल्याच्या उत्साहानं भारलेल्या या गुणवंतांमधली टवटवी आपसूकच त्याच्या सिनेमातून प्रतिबिंबित होते. `मस्त'मध्येही हेच होतं.
एक संगीतप्रधान परीकथा असं `मस्त'चं साधारण स्वरूप आहे. परीकथा अशासाठी, की एका सामान्य माणसाला पडलेलं, वास्तवात अशक्यप्राय भासणारं स्वप्न इथं चक्क खरं होताना दिसतं.
`मस्त'चा हा नायक आहे किट्टू (नवा चेहरा आफताब). पुण्यातला उच्चभ्रू मध्यवर्गातला कॉलेजच्या शेवटचया वर्षाचा स्वप्नाळू विद्यार्थी. तयाच्या वरपांगी सुखी आयुष्यात एकच समस्या आहे... मल्लिका (ऊर्मिला मातोंडकर). मल्लिका ही रूपेरी पडद्यावरची यशस्वी अभिनेत्री, लाखो दिलों की धडकन. ती कट्टूच्या हृदयाची सम्राज्ञी ओ. तिच्या जवळ जाण्याचं फक्त स्वप्नच पाहात नाही तो, तर ते स्वप्न वास्तवात आणण्यासाठी प्रयत्न करण्याइतकी भाबडी पण सच्ची जिद्दही आहे त्याच्यात.
वेडाच्याच पातळीवर गेलेला किट्टूचा प्रेमध्यास त्याला पुण्याहून मुंबईत खेचून आणतो. मल्लिकाच्या बंगल्याशेजारच्याच हॉटेलात तो `पोऱया'ची नोकरी करू लागतो. योगायोगानं त्याची तिची गाठ पडते. वास्तवात आपल्या कुटील मामाच्या (गोविंद नामदेव) दावणीला बांधलेली गरीब गाय असलेली मल्लिका पाहून किट्टू हादरतोच. अर्थातच या `डॅम्सेल इन डिस्ट्रेस'ची सुटका करण्याची जबाबदारी किट्टूवर आलीच. एका नाटय़मय प्रसंगानंतर तिला घेऊन पळ काढतो. तिला पुण्याच्या घरात आणून दडवतो. किट्टूच्या घरा मल्लिकाला प्रथमच घरपण जाणवतं. घराला घरपण देणारी माणसं भेटतात. किट्टू, त्याची बहीण निक्की (शीतल सुवर्णा), मैत्रीण निशा (अंतरा माळी) यांच्यासोबत दंगामस्तीमध्ये तिच्यातली मुलगी रमते, खुलते. `कुणामुळं आयुष्यच पालटल्यासारखां वाटतं, तेव्हा समजावं, की आपण प्रेमात पडलेली मल्लिका त्याचं आयुष्य आपल्यामुळे बिघडू नये, यासाठी स्वत:हून त्याच्यापासून दूर जातो....
...मात्र भावनाटय़ानं भरलेल्या `क्लायमॅक्स'मार्गे शेवट परीकथेसारखाच गोड होतो.
रमेश खाटकर आणि विनोद रंगनाथ यांनी `मस्त'ची कथा- पटकथा आणि संवादांचं संयुक्त लेखन केलंय. अप्राप्यच भासणारी नायिका आाि अतिसामान्य स्तरातला नायय याहंच्यातलं अंतर या कथेत नावन्य, नाटय़ आणि उत्सुकता निर्माण करतं. मल्लिकाची पडद्यावरची आत्मविश्वासपूर्ण, उन्माक, आवाहक प्रतिमा आणि तिचं वास्तवातलं या प्रतिमेच्या अगदी विरुद्ध करू, हा नाटय़ निर्माण करणारा आणखी एक महत्त्वाचा घटक.
व्यावसायिक सिनेमातले लोकप्रिय घटक, हॉलिवूडच्या म्युझिकल्यसचा बाज आणि ताजे- तरुण , क्वचितप्रसंगी प्रयोगशील भासणारे प्रसंग यांचा मेळ घालून लेखकद्वीनं `मस्त'ची भट्टी जमवली आहे. सिनेमाची एकूण धाटणी पॉपकॉर्नसारखी कुरकीत.
किट्टूच्या दिवास्वप्नांमध्ये मल्लिका त्याला भेटते नाचत- गात, सूलयींवर विहरत, थिरकत. मल्लिकाच्या दरवानानं हूसकावल्यावर लगेचच किट्टूला बंगल्याशेजारीच्या हॉटेलचा मालक उस्मानभाई (नीरज व्होरा) आसरा देतो. उस्मानभाई आणि हॉटेलातले कार्टूनछाप वेटर मिळून किट्टूचं स्वप्न खरं करण्यासाठी झटतात. तो तिच्या सेटवर पोहोचून तिला `इन फ्ला' पाहून धन्य होतो. तिच्याशी बोलतोसुद्धा. एके रात्री मामाजीकडून तिचा होणारा छळ न साहवून तो तिच्या खोलीत घुसतोच. त्याच्या फटक्यानं बेशुद्ध झालेल्या मामाजी शुद्धीवर यायच्या आत तो मल्लिकाला कन्व्हिन्स करून स्वत:बरोबर पळून जायला भाग पाडतोही.
पुढे सगळय़ा गावभर मल्लिकाचा शोध घेत वळसे मारणाऱया पोलिसांनी काखेतल्या हॉटेलातच दडलेला कळसा सापडत नाही. किट्टूच्या घरी त्याच्या खोलीत मल्लिका घरातल्या इतर कुणाला न सापडता राहू शकते. झटकन त्याच्या प्रेमातही पडते...
... सगळाच घटनाक्रम कसा स्वप्नवर... खोटा भासावा इतका कन्व्हिनियंट. असं कुणाचं आयुष्य असतं सहजसोपं? पण मग माणसांचं आयुष्य इतकं सोपं असतं, तर त्यांना स्वप्नं विकायला कुणी असे `फील गुड' सिनेमे कशाला काढले असते? आणि परीकथेत का कुणी तर्कशास्त्र शोधतं? राईसप्लेटचा पोटभर आनंद पॉपकॉर्नकडून कसा अपेक्षायचा?
शोधायचंच झलं तर पॉपकॉर्न कुठं नरम पडलंय का ते पाहता येईल. `मस्त'मध्ये पूर्वार्धात किट्टूच्या हाकलपट्टीपर्यंतचा भाग बराच सपाट जातो. मल्लिकाच्या विचारांमध्ये सतत `मस्त'- बेभान झालेला किट्टू दाख्वण्यासाठी लेखक- दिग्दर्शकांनी गाण्यांची भरमार केलीये या भागात. ही गाणी टाकाऊ बिल्कुलच नाहीत. त्यातून किट्टूचं `ऑब्सेशन', मल्लिकाचा `नायक' बनण्याची तीव्र उर्मी व्यक्त होते. या गाण्यांचं चित्रणही चकाचक; केवळ नेत्रसुखद नाह, तर एस्थेटिक. तरीही कथानकप्रधानतेची सवय झालेल्या प्रेक्षकाला `काहीच कसं घडत नाहीये' असा फील येतो आणि यात प्रेक्षकाला सर्वस्वी दोषी ठरवता येत नाही; कारण संपूर्ण सिनेमा काही अशा पद्धतीनं उलगडत नाही; क्लायमॅक्सपर्यंत तो रीतसर कथानकप्रधान होऊन जातो. त्यामुळे पूर्वार्धाचा हा भाग उर्वरित सिनेमापेक्षा वेगळा- तुकडा पडल्यासाखा पडतो. शिवया या गाण्यांचं संगीत- नृत्यदिग्दर्शन, एकूण टेकिंग यावर हॉलिवूडच्या म्युझिकल्सची नको इतकी छाप आहे.
नको इतकी अशासाठी मल्लाका ही भारतीय सिनेमांमधली लोकप्रिय नटी आहे आणि किट्टू हा भारतीय सिनेमाचा प्रेक्षक. त्याच्या स्वप्नातली मल्लिका मात्र फारच अ-भारतीय वाटते. किट्टूच्या आधुनिक कॉन्व्हेंटी, एम टीव्हीप्रभावित भावविश्वात ते सहज घ्घ्डत असेलही; पण सामान्य प्रेक्षकाशी त्याच्या भाविविश्वाचा सांदा जुळण्यात हा आंग्लोळलेपणा मोठा अडसर ठरतो.
`मस्त'मध्ये सगळय़ात घोटाळय़ात टाकतं ते किट्टूचं मल्लिकावरचं प्रेम. तो तिच्यावर मनापासून जे प्रेम कराते, ते तिच्या पडद्यावरच्या प्रतिमेवरचं भाबडं प्रेम आहे. तरीही तिला प्रत्यक्षात प्रतिमेच्या अगदी विरुद्ध रूपात पाहिल्यावर त्याच्या कल्पनेला धक्का बसल्याचं कुठेच दिसत नाही. कदाचित तिच्या असहाय स्थितीनं हेलावल्यामुळं त्याच्या प्रेमाला तिच्याविषयीच्या काळजीचे धुमारे फटत असतेल, तिचा प्रत्यक्ष सहवास लाभल्यावर मिच्या त्याच्यातल्या सामाजिक- आर्थिक अंतराचा साक्षात्कार होऊन ते प्रेम दबतही असेल; पण त्याया मनात की उलघालीच दिसत नाहीत. ती सोबत असताना तो फारच `भित्रा'सारखा वागतो आणि ती सोडून गेल्यावर त्याला `मला न सांगत कशी गेली' याचाच धक्का त्याला अधिक बसलेला दिसतो. जणू निरोप घेऊन गेली असती, तर याला सगळं भरूनच पावणार होतं!
हे सगळे घोटाळे होण्याचं कारण म्हणजे लेखक- दिग्दर्शकांनी किट्टूच्या प्रेमावर लादलेली शाळकरी उदात्तता, नटीच्या प्रेमात पडणारा कोणताही माणूस तिच्या शारीर सौंदर्यानंच प्रथम गारद झालेला असतो. त्याला वाटणारी असोशी बहुश: शारीर जवळिकीच्या पातळीवरची असते, तो त्याच्या स्वप्नांमध्ये तिच्याशी संग करत असतो, हे लेखक- दिग्दर्शकांच्या गावीच कसं नाही. किट्टूच्या ध्यानीमनी- स्वप्नी वसलेली मल्लिका त्याला आणि प्रेक्षकाला कशी दिसते? ती विलक्षण ग्लॅमरस, कमनीय दहाची सगळी वळणं आसुसून दाखवणाऱया - कधी तंग, कधी तोकडय़ा, तर कधी तंग आण तोकडय़ा वेशभूषेत, उन्मादक हावभावांस वावरते... एकदम `रंगीला' स्टाईल `ऊम्फ गर्ल' आता ही स्वप्नं किट्टूची आहेत, त्यातली मल्लिका मदनिका आहे, तर त्याचं प्रेम इतकं शारीरनिरपेक्ष कसं मानायचं, की त्यालही आपल्या मूलभूत भावनांचं भान नाही. त्याचं वय आणि इतर पार्श्वभूमी पाहता हे शक्य वाटत नाही.
यात दिग्दर्शकीय चलाखी अशी, की मल्लिकाचा हा सगळा आवाहक वापर तिच्याकडूनही थेट घडत नाही. तिचे सगळे आळोखेपिळोखे, उसासे आत्ममग्न, ते पाहूनही- कल्पूनही किट्टू ऑल्मोस्ट आध्यात्ममग्न, म्हणज्Z येऊन जाऊन उरणारे आपण प्रेक्षक तेवढेच फक्त देहमग्न? पांढऱया पारदर्शक साडीत अंतर्वस्त्रविना चिंब- चिप्प भिजून चेहऱयावर राज कपूरच्या नायिकांपेक्षा वरचढ गुगली झाला हा.
प्रेमाच्या परीकथेत बाकी सगळं खोटं चालतं, पण प्रेमच खोटं वाटून कसं चालेल? हा भुसभुशीत पाया किट्टूच्या प्रेमातली कशिशच काढून घेतो, मग प्रेक्षकाला त्याच्या भावनेत स्वत:ची प्रेमभावना गवसायची कशी?
यामुळं होतं काय, की `मस्त'मधल्या घडामोडी आणि प्रेक्षक यांच्यातलं अंतर कायम राहतं. परिणाम घडवते ती चुरचुरीत चतुराई आणि तांत्रिक सफाई. अथांत या प्रांतात रामगोपाल काही कसर सोडत नाही. पठडीबाहेरच्या निसर्गसौंदर्यानं लोकसेशन्स, त्यांची चित्रमयता टिपून `लँडस्केप्स'सारखी दृश्यमान करणारं पियूष शाह यांचं छापालेखन, राह खान आणि हॉवर्ड रोझमेयर यांचं उत्फुल्ल नृत्यदर्शन आणि उर्मिलाच्या सौंदर्यात चार चाँद लावणारी मनीष मल्होत्राची वेशभूषा- यातून मल्लिकाच रूपेरी प्रतिमा प्रेक्षकावर गारूड करते. मल्लिका किट्टूच्या आयुष्यात - वास्तवात आल्यानंतर तिच्या पेहरावात हारा बदल लक्षणीय आहे. किट्टू आणि मल्लिका यांच्या एकत्र स्वप्नरंजनात्मक `रूकी रूकी थी जिंदगी' या गाण्यातले तिचे कपडे `फिल्मी' नाहीत, तर तिच्या वयाच्या `मुली'चे कपडे आहेत. मल्लिका किट्टूच्या प्रेमा पडते तेव्हा तिचा बेभानपणा व्यक्त करणाऱया शीर्षकगीताच्या स्त्राeस्वरातल्या आवृत्तीत तर ती रंगंरंगोटी काढून घेतलेल्या साध्या चेहऱयानं समोर तेते. निकी- मल्लिका- किट्टू आणि निशा यांच्यातल्या प्रेमविषयक गप्तांतून सहज सुरू होणारं `सुना था, देखा न था' या गाण्याचं निर्व्याज, अकृत्रिम टेकिंग या चौघांना- मल्लिकालाही अगदी निरागस बनवून टाकतं.
मल्लिकाच्या घरात पिझ्झा पोचवायला गेलेला किट्टू परतल्यावर तिची भेट कशी झाली, याची कपोलकल्पित रसभरीत कहाणी `पूछो ना यार क्या हुआ' या गाण्यातून सांगतो, तेव्हा उस्मानभाई आणि कंपूचा सहभाग धम्माल उडवतो, किट्टूच्या वर्णनातला मल्लिकाचा गळेपडू वावर `फिल्मी प्रेमा'ची मस्त रेवडी उडवतो. उस्मानभाईचा कंपू पहिल्यांदाच किट्टूला भेटतो, तेव्हाचा प्रसंग आणि `मस्त' म्हणजे काय, याचं सामूहिक -नाटय़पूर्ण- प्रात्यक्षिकासह स्पष्टीकरण करण्याचा प्रसंग अनोखा चक्रम विनादाचा आविष्कार घडवतात.
मुंबईत उतरल्यापासून किट्टूला वेळोवेळी भेटणाऱया रिक्षावाल्याचं (स्न्Zहल डाबी) श्रीदेवीवरचं प्रामाणिक प्रेम आणि बोनी कपूरबद्दलचा `सवतामत्सर'ही हशाची कारंजी उसळवतो.
निकी - किट्टू - निशा - किट्टूचे आई-वडील यांच्यातले आधुनिकोत्तर भावबंध सिनेमाला रसरशीत टवटवीही देतात. मल्लिकाच्या वेडामुळं किट्टूवर डाफरणारे त्याचे वडील रेखाचं नाव निघालं, तरी कसे हुळहुळे होतात, याचं दर्शन घडवणारा प्रसंग लोभसवाणा आहे. त्याचा सिनेमातल्या शेवटाशी जोडलेला सांधा तर अलफातूनच. जिज्ञासूंनी तो प्रत्यक्षच पाहावा, इतका हास्यस्फोटक प्रसंग आहे हा शेवटचा धक्का.
रामगोपालला सिनेमात सिनेमा घडवण्याचीही दांडगी हौस आहे. सगळय़ा बडय़ा नटनटय़ांशी जिवलग यारी असल्याचा अविर्भाव मिरवणारा फिल्म जर्नालिस्ट आणि `हम आपके दिलमे रहके आपसे प्यार करने लगे है' हे मल्लिकाच्या सिनेमाचं नाव या सिनेसृष्टीवरच्या तिखट चुरचुरीत कॉमेंटस ऱ मजा आणतात. सगळय़ा संवादांमदये ही नर्मविनोदी खुमारी आहे, तिला संधी मिळेल तिथे रामगोपालने स्लॅपस्टिक ढंगाच्या विनोदाची जोड दिली आहे.
संदीप चौटा याच्या तरुणाईची झिंग पकणाल्या संगीत- पार्श्वसंगीतात अधेमधे `रंगीला'च्या `क्या करे क्या ना करे' आणि `प्यार ये जाने कैसा है'च्या छटा जाणवतात; पण त्याचा स्वतंत्र बाज अधिक प्रभावी ठरतो. मल्लिकाच्या फिल्मी गाण्यांसाठी आशा भोसलेंचा मादक आवाज आणि तिच्या `वस्तवा'तल्या गाण्यांसाठी सुनिधी चौहानचा तरुण स्वर वापरण्यातली कल्पनाही दाद देण्याजोगी.
आफताबचं या सिनेमातून होणारं पदार्पण आश्वासक किट्टूला
साजेसं आहे, हे त्याचं महत्त्वाचं कारण. त्याचा पडद्यावरचा वावरही आत्मविश्वासपूर्ण आणि सहज आहे.
अंतरा माळीही उपनायिकेच्या भूमिकेत अशाच सहजतेनं वावरते, क्लायमॅक्सला समंजस भावदर्शनाची गरजही भागवते. दलीप ताहिल, स्मिता जयकर, शेतल सुवर्णा, नीरज व्होरा, गोविंद नायदेव, स्न्Zहल डाबी आदी सहकलाकारांची कामगिरीही उत्तम आहे.
अंतरा माळीही उपनायिकेच्या भूमिकेत अशाच सहजतेनं वावरते, क्लायमॅक्सला समंजस भावदर्शनाची गरजही भागवते. दलीप ताहिल, स्मिता जयकर, शेतल सुवर्णा, नीरज व्होरा, गोविंद नायदेव, स्न्Zहल डाबी आदी सहकलाकारांची कामगिरीही उत्तम आहे.
उर्मिला मातोंडकर ही `मस्त'ची मस्ती, केंद्रस्थानी असणारी अभिनेत्री. मल्लिकाच्या रूपेरी आणि वास्तव रूपांमधली तफावत तिनं सफाईदारपणे साकारली आहे. इथल्या फिल्मी गाण्यांमध्ये मदनिका दिसणारी उर्मिला किट्टूची साथ मिळावलर अगदी लहान, त्यांच्या वयाची मुलगी - `गर्ल नेक्स्ट डोअर' दिसू लाग्ते, यात वेश - रंगभूषेबरोबरच तिच्या कुशल अभिनयाचा मोठा वाटा आहे.
टाईमपास करतानाही काही एका दर्जाचा टाईमपास करायची इच्छा आणि प्रवृत्ती असेल आणि `पॉपकॉर्न'च्या गुणवैशिष्टय़ांबद्दलच्या कल्पना स्पष्ट असतील, तर(च) `मस्त'मधून मस्त मनोरंजन लाभेल.
(महाराष्ट्र टाइम्स)
No comments:
Post a Comment