Thursday, April 14, 2011

हसवणारं हवामान (द अव्हेंजर्स)


दोन ब्रिटिश माणसं भेटली तर सहसा बोलत नाहीत.
बोललीच तर संभाषणात हवामानाचा विषय निघाला नाही, असं होणारच नाही. हवामानावर टिप्पणी हा ब्रिटिश संभाषण  उपचारांचा एक भाग आहे... अविभाज्य सांस्कृतिक घटकच.
पाऊस- उघडडिपीचा ब्रिटिश हवामाचा खेळ ज्यांना प्रत्यक्ष पाहून वा पुस्तके, चित्रपट, टीव्हीतून परिचित आहे. त्यांना ब्रिटिश भावजीवनातील हवामानाचे अनन्यसाधारण स्थान समजू शकेल.
हे हवामान बिघडण्याचा, ते `ताब्यात' घेऊन ब्रिटनवरच नव्हे, तर संपूर्णजगावर राज्य करण्याचा चंग कुणा माथेफिरू ब्रिटिश शास्त्रज्ञानं बांधला तर?
`वॉर्नर ब्रदर्स'च्या `द अव्हेंजर्स'चं हे `टिपिकली ब्रिटिश' कथासूत्र आहे. इथे सर ऑगस्ट ही विन्टर (शॉन कॉनरी) या प्रचंड बुद्धिमान हवामान जज्ञानं ब्रिटनचं हवामान जिंकलंय. तो आपल्या मनाप्रमाणं हवामान ताब्यात राहिलेलं नाही. माझ्या अखत्यारीत आलंय. तुम्हाला आता चांगलं हवामान माझ्याकडून विकत घ्यावं लागेल.' असं तो जगाला ठणकावून सांगतोय.
या समस्येवर ब्रिटनचा उपायही `टिपिकली ब्रिटिश' आहे. ` द मिनिस्ट्री' या ब्रिटनच्या गुप्तचर विभागाकडून दोन एजंटांची सर ऑगस्टवर मात करण्यासाठी नेमणूक करण्यात आलीये. जॉन स्टीड (राल्फफिएन्स) आणि मिसेस एमा पील (उमा थरमन) यांची. हेच आहेत `द ऍव्हेंजर्स.'
हे `ऍव्हेंजर्स' जगभरातल्या 120 देशांमध्ये दूरचित्रवाणी मालिकेच्या रूपाने 1961 पासून 37 वर्षे लोकप्रिय आहेत. त्यांचं हे रूपेरी पडद्यावरचं पदार्पण खास शैलीत दणक्यात झालंय.
जॉन स्टीड आणि एमा पील नाना हिकमती लढवून अनेक संकटांवर मात करून सर ऑगस्टच्या गुप्त तळावर पोहोचतात आणि तो उद्ध्वस्त करतात, हेच सिनेमाचं अपेक्षित कथानक.
पण ते घडतं अनपेक्षित, रोमांचकारक आणि हास्यस्फोटक घटनांच्या मालिकेतून. `द ऍव्हेंजर्स'चा गृहीत काळ आहे 1999चा. पण सिनेमात वातावरण मात्र जाणीवपूर्वक 1960 च्या आसपासचं ठेवण्यात आलं आहे. सगळा सिनेमा घडतो लंडनमध्ये... त्या काळातल्या शांत निवांत लंडनमध्ये... खास ब्रिटिश वृत्तींनी परिपूर्ण पात्रे हे `ऍव्हेंजर्स'चं प्रमुख वैशिष्टय़ आहे
1999 सालात ब्रिटनचा आघाडीचा गुप्तहेर जॉन स्टीड एक छत्री आणि बऊलर हॅट ही `शस्त्रZ' बाळगत वावरतो. छत्रीच्या मुठीत बसवलेली तलवार हेच त्याच्याकडच प्राणघातक शस्त्र. दुसरं शस्त्र आहे मोजून-मापून वापरली जाणारी, शिष्टसंमत तरीही खोचक-बोचक, कोरडय़ा विनादानं भरलेली भाषा आणि `इम्पेकेबल ब्रिटिश मॅनर्स.
एमा पील ही तयाची सहकारी मध्यमवर्गीय सुंदर स्त्राe. तिचं `विवाहित' असणं, `मिसेस' पील असणं ती शस्त्रासारखं वापरते... विशेषत: जीन स्टीडबरोबरच्या जवळिकीत. ती स्वतंत्र बुद्धिमत्तेची, स्वत:च्या स्त्राe शक्तीची जाणीव असलेली, सौंदर्याचा बुद्धिमान वापर करणारी भलतीच आकर्षक पुरंध्री आहे. स्टीड आणि पील एकत्र वावरतात, एकमेकांवर चिडतात, खुश होतात, कुरघोडय़ा करतात, सावरूनही घेतात, जवळ येतात, दूर जातात. या सगळय़ा सहवासात एक छुपं शारीर आकर्षण आहे. तयातून निर्माण होणारा लैंगिक तणाव हे खास `ऍवहेंजर्स'मध्येच अनुभवण्याचं प्रकरण आहे.
लेखक डॉन मॅकफर्सन आणि दिग्दर्शक जेरेमाय चेचिक यांनी `ऍव्हेंजर्स' रूपेरी पडद्यावर आणताना भरपूर मनोरंजक मसाला तयात ठासून भरलाय. ऍक्शन, रहस्य, विनोद, प्रणय, विज्ञान काल्पनिका आणि साहस यांचं फर्मास रसायन तयार केलंय. `द ऍव्हेंजर्स' मालिकेशी परिचित प्रेक्षकांना तया मालिकेतून मिळालेला आनंद मिळावा आणि त्याचवेळी `ऍव्हेंजर्स'ना न ओळखणाऱया नव्या प्रेक्षकांना तयांची ओळख करून घेताना अडचण भासू नये, ही जोखमीची जबाबदारी त्यांनी लीलया पेलली आहे. संवादांमधून फुलणारा ब्रिटिश विनोद अधिक परिणामकारक करण्यासाठी संपूणं सिनेमाला एक `सररियल लुक' दिला आहे.
स्टीड आणि पील यांया वाटेतले अडथळेही चित्तचक्षुचमत्कारिक आहेत. सर ऑगस्टच्या गुप्त खलबतखान्यात `टेडी बेअर'च्या पेहरावात जमणारे त्याचे साथीदार, गोळीबार करणाऱया `रिमोट कंट्रोल'चलित वेगवान यांत्रिक माश्या, सर ऑगस्टच्या आवारातला भुलभुलय्या बगीचा, मयसभेसारखी चकवणरी रचना असलेला तयाच्या महालातल्या एक मजला, एमा पीलची `क्लोन' असलेली खतरनाक डुप्लिकेट बाई स्टीड- पील यांना सहाय्य करण्यासाठी पाठवलेली एलिस नावाची (आठवा `एलिस इन वंडरलँड) कडक म्हातारी...
हे सगळे घटक `ऍव्हेंजर्स'मध्ये प्रेक्षकाला पूर्णपणे गुंतवणून घेतात. गुप्तचर खात्याचे `मदर' आणि `फादर' हे प्रमुख म्हणजे स्वतंत्र उपप्रकरणं आहेत. खातयाचा बॉस पुरुष. तो `मदर' या संकेतनामानं ओळखला जातो. उपप्रमुख आहे एक वृद्ध स्त्राe. तिचं संकेतनाम `फादर.' कुठल्यातरी अंधाऱया खोलीत सतत स्ँडविचं खात, कॉफी पीत, पर्सनल सेक्रेटरीवर हात फिरवीत, गोंधळलेल्या चेहऱयानं गुप्तचर विभाग चालवणारा `मदर' आणि आंधळय़ाचा चष्मा घालून, काठी घेऊन वावरणारी `फादर' ही अर्कचित्रंच आहेत. मॅकफर्सननं खुसखुशीत संवादांमध्ये `वेदर'बरोबरच `मदर' आणि `फादर'वरची एकही कोटी सोडलेली नाही.
`ऍव्हेंजर्स'मध्ये हॉलिवूड आणि ब्रिटिनच्या रूपेरी पडद्यावरच्या सर्व प्रकारच्या गुप्तचरपटांचं झकास विडंबनही केलंय. स्टीडच्या आगमनाला जेम्स बाँडपटांच्या प्रख्यात शीषंकसंगीतासारखं संगीत दिलंय. सिनेमाच्या शेवटी नायक-नायिका समुद्रतळावरून एका हवाबंद गोल यानातून पाण्याच्या पृष्ठभागावर येतात. हा शेवट आणि त्यात स्टीड-पील यांचं `वांचिक' प्रणयमान असणंही, बाँडपटाचीच आठवण करून देतं. टीव्हीवरचा अजरामर स्टीड साकारणाऱया पॅट्रिक मॅक्नीचा फक्त आवाज फोनवर वापरून `ऍव्हेंजर्स'कारांनी  स्मरणरंजनमग्न प्रेक्षकांच्या भावनेला हात घालण्याचं कामही चोख बजावलंय.
`द इंग्लिश पेशंट'साठी ऑस्कर पटकाविणाऱया राल्फ फिएन्सनं जॉन स्टीड झोकात साकारलाय. त्याला उमा थरमननं अप्रतिम साथ दिलीये. ही जोडी मूळ मालिकेतल्या पॅट्रिक मॅक्नी-डायना रिंग यांची नक्कल न करता स्वतंत्रपणे स्टीड-पील म्हणून छाप पाडते. सर ऑगस्ट झालेल्या शॉन कॉनरीनं चक्रम, कुटील शास्त्रज्ञ साकारताना आपल्या अभिनयकौशल्याचा वेगळाच पैलू प्रकाशात आणलाय. `सेव्हिंग/ डिस्ट्रॉइभग द वर्ल्ड इन स्टाईल' हे या पात्रांचे ब्रीदवाक्य आहे. हे सर्व काही `इन स्टाईल' करणं, सिनेमात जाणवत राहातं. या तिघांची आपापली शैली आणि दिग्दर्शकाची `टेकिंग'ची स्वतंत्र शैली साकारते. त्यांना जिम ब्रॉडबेंट (मदर), फियोना शॉ (फादर) आणि इटन ऍटकिक्स (एलिस) या मातब्बर कलावंतानीं मस्त साथ दिली आहे.
लंडनवर आणि ब्रिटिश ह्यूमर'वर प्रेम करणाऱयांना `द ऍव्हेंजर्स' चुकवून चालणार नाही. इतरांना तो लंडन आणि `ब्रिटिश ह्यूमर 'च्या प्रेमात पाडेल

(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment