Thursday, April 7, 2011

मोले घातले हसाया (गुदगुदी)

सुरेखशी बायको, सुस्थापित नोकरी, आर्थिक स्थैर्य, `हम दो हमारा एक' असा सुखाचा संसार लाभला तरी पस्तिशी-चाळीशीचं वयच अशी काहीतरी किमया करतं, की भला पुरुषही थोडासा का होईना चळतो, एखादी सुकुमार बाला आयुष्यात अपघातानं आली तर त्याचा तोल ढळतो; किमान तो ढळण्याची शक्यता निर्माण होते.
मानसशास्त्राeय संशोधनातून सिद्ध झालेलं हे एक सार्वकालिक शास्त्राeय सत्य... उत्तम खुसखुशीत विनादपटासाठीचं हे परफेक्त कथाबीज. बासून चटर्ज़ींसारख्या घरेलू, संयत आणि दर्जेदार विनादपटांची मालिका देणाऱया नामचीन दिग्दर्शकाला या कथाबाजातून सोनं फुलवता आलं असतं; पण बासुदांनी भारतीय भूमीत हे बीज रुजताना ओंगळ, बीभत्स प्रसंगांचं तण काढलं नाही. जीव ओतून मेहनत घेतली नाही. बंदिस्त पटकथेचं कुंपण घातलं नाही. उलट, इंग्रजी चित्रपटांवरून उचलेगिरी
करून या मातीला न मानवणारं इंपोर्टेड खत घालून बीजाचाही सत्यानाश केला आणि आपल्या कर्तृत्वभूमीवर `गुदगुदी'च्या रूपानं खारजमिनीचा बट्टा लावून घतेला.
मुळात अधेड वयाच्या पुरुषाला एखाद्या नवयुवतीचं शारीरिक- मानसिक आकर्षण वाटणं, हा काही पुढारलेल्या पाश्चात्य देशांतच घडणारा प्रकार नाही. तो भारतातही सहज शक्य आहे. भारतीय वातावरणात ही कथा कशी घडेल, याचा विचार न करता बासुदांनी मरलिन मन्रोच्या गाजलेल्या `सेव्हन इयर्स इच' या किंचित चावट विनादपटाची सहीसही नक्कल मारण्याचा हास्यास्पद उद्योग केला आहे.
सुरक्षिततेचा अंदाज
अजयसिंह (अनुपम खेर) हा जयपूरमधला मध्यमवयीन सुखवस्तू सेल्स एक्झिक्युटिव्ह. सेल्स प्रमोशनसाठी सतत नवनव्या कल्पना लढवण्याच्या सवयीमुळं तो कायम कल्पनेच्याच राज्यात वावरत राहतो. नातेवाईकाच्या लग्नासाठी त्याला चार दिवस मुंबईला एका फ्लॅटमध्ये एकटं राहण्याची वेळ येते. शेजारच्या फ्लॅटमधली चांदनी (प्रतिभा सिन्हा) ही उदयोन्मुख नटी आणि मॉडेल वारंवार त्याच्या फ्लॅटमध्ये येऊ लागते. तिच्या फ्लॅटमधला पंखा बिघडल्यामुळं अजयच्या फ्लॅटमधला `एसी'च्या गारव्यात जास्ती जास्त वेळ काढण्याचा तिचा हेतू असतो. त्यातून मध्यमवयीन विवाहित पुरुष सर्व गरजा भागून तृप्त झाल्यानं इतर पुरुषांपेक्षा जास्त `सुरक्षित' असतात ही तिची गैरसमजूत असते.
चांदनीचा वावर, तिचं बिनधास्त वागणं, ऐक गद्धेचाळिशीचा बहर आणि वाट्टेल तशी हुंदडणारी कल्पनाशक्ती यांतून अजयला चांदनी आपल्या प्रेमात पडल्याचा साक्षात्कार हातो. त्यातून अनेक गमतीजमती (बासुदांच्या मते) घडतात. चांदणी अजयला योग्य वेळी ताळय़ावर आणते. थोडा बहकला तरी तो किती सज्जन, चांगला माणूस ओ आणि त्याचं तसं असणंच किती आश्वासक आहे, याची जाणीव करून देते.
`सेव्हन इयर्स इच'मध्ये सगळे प्रसंग एका घरात घडतात, म्हणून `गुदगुदी'मध्ये सगळे प्रसंग एका फ्लॅटमध्ये घडतात. तिथे मरलिन मन्रो बिनधास्त नायिका आहे. तशी मुलगी भारतात असलीच तर मुंबईतच असणार; कारण ही मायानगरी. मोहाची दुनिया. मग नायक बाहेरगावचा असणार, हे ओघानंच आलं. मूळ कथाबीजाचा आत्मा जाणून न घेता बासुदांनी असल्या कसरती करत पटकथा रचली आहे.
भारतीय प्रेक्षकांसाठी सिनेमा काढायचा, तोही नर्मविनोदी म्हटल्यावर शरीर आकर्षणाचा पैलू संदिग्धच ठेवणं सोयचं. त्याला थेट भिडण्याचं धाष्टय़ मुळात नाही आणि दाखवलं तरी सेन्सॉरच्या कात्रीचं भय. मग हा पैलू मांडायची हौस कुलूप, किल्ली, कोकच्या बाटल्या वगैरे प्रतिमा-प्रतिकांच्या वापरातून, तयांच्या उल्लेखातून, डेव्हिड धवनलाही शरमायला व्हावं, असले द्वर्थी, बीभत्स संवाद पावरून भागवून घ्यची. असा सगळा प्रकार.
निर्मितीमूल्यंही भिकार
बराच काळ टीव्ही सिरियल बनवण्याची सवय लागल्यामुळे असेल कदाचित; पण बासुदांना आपल्याकडे मूव्ही कॅमेरा आहे, याचं भान राहिलेलं नसावं. त्यामुळे दूरदर्शनच्या दुसऱया वाहिनीवरून कमी बजेटात प्रसारित होणाऱया कळकट मराठी मालिकेची कळा असलेला `गुदगुदी' त्यांनी मोठय़ा पडद्यावर काढला आहे.
छोटय़ा-छोटय़ा सिच्युएशन्स फुलवून प्रेक्षकांना गालातल्या गालात खुसखुसायला लावण्यात बासुदा माहिर. `गुदगुदी'मध्ये दुर्दैवानं बासुदांची ही सिद्धीही त्यांच्यावर रूसून फुरंगटून बसली आहे.
बासुदांनी `गुदगुदी'त विनोद निर्मितीसाठी साचेबंद पात्रांचे तयार ठोकळे वापरले आहेत. दर वाक्याला `भाईसाब, भाईसाब' म्हणणारा, तोंडाची अखंड टकळी चालवणारा सतीश कौशिक. अंगविक्षेपातून केविलवाणे `इनोद' करणारा मुश्ताक अहमद आणि भडकिले- फाकडू कपडे घालून एकसुरी, रेकत बोलणारा देव मुखर्जी ही `पात्रं' डोकं उठवतात.
बावळटपणाचं अजीर्ण
अनुपम खेरच्या मर्यादाही `गुदगुदी'मध्ये चांगल्याच उघडय़ा पडतात. चांगल्या पटकथेचं, संवादांचं पाठबळ नसेल तर अनुपम किती बोअरिंग होऊ शकतो, हे `गुदगुदी' पाहिल्यावर समजतं. त्याच्या `बावळट' भावमुद्रचंही अजीर्ण होतं. जुगल हंसराजला चांदनीवर मनापासून प्रेम करणाऱया गायकाची भूमिका मिळाली आह. पाहुण्या कलाकाराच्या या छोटय़ाशा भूमिकेतही `शिरावे की न शिरावे' या पेचात पडल्यासारखा  तो अलिप्त अवघडलेपणाने वावरतो. पुन्हा चेहरा असा गोंडस की कोणतंही गाणं गाताना हा `आई तुझं लेकरू, वेडं गं कोकरू, रस्ता चुकलंय, वाटेला मुकलंय, सांग मी काय करू' हेच गाणं गातोयसं वाटतं.
प्रतिभा सिन्हाला अभिनयप्रतिभा दाखवण्याची संधी `गुदगुदी'नं दिल्याची बोलवा होती; पण बासुदांचा घरेलू सिनेमा असला तरी भरपूर `लो कट'`चे कपडे घालून प्रेक्षकांच्या काळजात धडकी भरवीत बागडणं आणि पावसात भिजणं काही तिच्या नजिबाचं टळलेलं नाही. मोकळेढाकळेपणा दाखवण्यासाठी प्रत्येक वेळी एक टाळी वाजवून मान वेडीवाकडी करून दात विचकत हण्याची `अदा' तिला देण्यात आली आह. तिच्या पडद्यावरच्या उपस्थितीतला तीनचतुर्थांश वेळ या अदेतच पार पडला आहे.
 `गुदगुदी' पाहून थोडंसं खुसखुसावं, अशी माफक अपेक्षा असेल तर किमान दोन माणसांनी दोन वेळा `गुदगुदी' पाहायला हवा. एकानं सिनेमा पाहायचा आणि दुसऱयानं त्याला गुदगुल्या करायच्या, असं केलं तरच ही अपेक्षा पूर्ण होईल.
........................................................................
गुदगुदी
कार्यकारी निर्माता : अमित खन्ना, महेश भट
दिग्दर्शक : बासू चटजी
संगीत : बप्पी लाहिरी
कलाकार : अनुपम खेर, प्रतिभा सिन्हा, जुगल हंसराज, सतीश सिन्हा, जुगल हंसराज, सतीश कौशिक, प्रतीक्षा लोणकर
..........................................................................

(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment