ताई एकदम रूबाबदार आहेत... अगदी राजेशाही डौल आहे त्यांच्या दिसण्यात... उगाचच का त्या एका चॅनेलच्या र्कत्यार्धत्या आहेत आणि 'चेहरा'ही आहेत?...
चॅनेलबाहेरचा चॅनेलचा चेहरा त्यांचाच आहे. त्याच सगळीकडे चॅनेलचं प्रतिनिधित्व करतात. पण , चॅनेलवरही चेहरा त्यांचाच! म्हणजे केव्हाही चॅनेल लावा, त्या दिसतातच (किंवा 'त्या'च दिसतात). चॅनेलच्या प्रोमोमध्ये त्या आहेत. एका कार्यक्रमाच्या त्या सूत्रधार आहेत. त्यांच्याच सिनेमाचे प्रोमो जाहिरातींच्या स्लॉटमध्ये झळकत असतात, अनेक कार्यक्रमांची संकल्पना त्यांची, कित्येक कार्यक्रमांचं दिग्दर्शन त्यांचं. इतकंच काय, परवा आपल्याच चॅनेलवरच्या एका कार्यक्रमात त्या 'पाहुण्या' म्हणूनही आल्या होत्या! (आता याचं आपल्याला खरं म्हणजे आश्चर्य वाटायला नको. आपल्या मराठीत एका दैनिकाचे कार्यकारी संपादक दैनिकाच्या संपादकाची पाच-सात भागांत मुलाखत घेतात आणि ती रोज मुख्य बातमी बनते, हेही आपण पाहतोच. असो.)
तर ताई चचेर्च्या एका कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतात. लोकांच्या जिव्हाळ्याचा एखादा करंट टॉपिक घेऊन त्या विषयातले तज्ज्ञ , पत्रकार अशा नामवंत मंडळींना त्या विषयावर बोलण्यासाठी बोलावतात आणि...
... आणि त्यांना बोलूच देत नाहीत!
साधारणपणे घडतं असं की कार्यक्रम सुरू होताच ताई त्या दिवशीच्या विषयाची प्रदीर्घ ओळख करून देतात. मग पाहुण्यांची ओळख करून देतात. मग चर्चा सुरू होते. ताई कुणातरी पाहुण्याला एखादा प्रश्ान् विचारतात. म्हणजे त्या प्रश्ान् विचारायला सुरुवात करतात , तेव्हा पाहुणा उत्तर द्यायला सज्ज असतो, पण ताईंचा प्रश्ान् पुरा होईतो, आपण उत्तरादाखल जे बोलणार होतो, ते त्याच बोलून गेल्या आहेत, हे लक्षात घेऊन तो ऑल्मोस्ट 'हो बरोबर आहे' किंवा 'नाही, हे योग्य नाही' इतकंच पुटपुटतो. की लगेच दुसऱ्या पाहुण्याला दुसरा प्रदीर्घ प्रश्ान्. तोही जेमतेम पुटपुटतो ना पुटपुटतो तोच तिसरा पाहुणा.
प्रश्ानंच्या मध्येमध्येही ताईंचं स्वतंत्र आणि प्रदीर्घ भाष्य सुरू असतंच. पुढे जसजशी चर्चा रंगत जाते (म्हणजे प्रमुख वक्त्या म्हणून ताईच ती रंगवत असतात) तसतसं ताईंना अधिकाधिक स्फुरण चढतं आणि सूत्रसंचालक आणि चर्चक (म्हणजे पाटिर्सिपंट) यांच्यातला भेदच नष्ट होतो. ताई तावातावाने स्वत:च एखादा मुद्दा जोरजोरात मांडू लागतात... म्हणजे क्रिकेट मॅचमध्ये अंपायरने न राहवून एखादा बॉल टाकावा किंवा बॅट्समनकडून बॅट हिसकावून स्वत: स्टान्स घ्यावा किंवा फुटबॉलच्या रेफ्रीने स्वत:च एक किक हाणावी, असं काहीतरी घडू लागतं. एव्हाना चचेर्साठी आलेल्या पाहुण्यांचा धीर खचलेला असतो. काहीजणांना तर पाऊण कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत तोंडही उघडायची संधी मिळालेली नसते.
उदाहरणार्थ एकदा शरीरविक्रय करणाऱ्या महिलांच्या प्रश्ानंवरचा कार्यक्रम होता. त्यांचा 'व्यवसाय' कायदेशीर करावा की नाही, यावर त्यांच्यात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे तज्ज्ञ बोलावण्यात आले होते. एक शरीरविक्रय करणारी महिलाही चचेर्त होती. पण, प्रत्यक्ष चचेर्च्या वेळी ताई आणि तज्ज्ञ यांनी मिळून जडजंबाल भाषेत असा काही धुव्वा उडवला की जिच्या भल्यासाठी ही सगळी चर्चा चालली होती, ती 'कथानायिका' भर कार्यक्रमात मस्त पेंगू लागली होती...
तात्पर्य : ताई बोलायला बोलावतील, तेव्हा लक्षात ठेवा, त्या बोलू देतीलच, असं नाही...

No comments:
Post a Comment