सीमेवरचं घर...
...' धप्प' आवाज करून एक फुटबॉल अंगणात येऊन पडतो. घरातल्या छोट्याच्या मनात उत्सुकता. तो अंगणात जाऊन बॉलचा ताबा घेणार, तर काटेरी कुंपणाच्या पलीकडून हाकारा. त्याच्याच वयाचा मुलगा. त्याचा हा फुटबॉल. 'किक मारून माझ्याकडे पाठव', असं तो त्याच्या भाषेतून, हातवारे करकरून सांगतो. हा बॉल तिकडे पाठवतो. तो हातवारे करून याला बोलावून घेतो. दोघेही काटेरी कुंपणाच्या आत फुटबॉल खेळू लागतात... जिथे डोंगरही कापून विभागलेला आहे, अशा दोन देशांच्या काटेरी सीमेमध्ये असा 'संवाद' सुरू होतो...
* तुफान पावसात भररस्त्यात झाड कोसळलंय. वाहनं अडकलीयेत. स्कूलबसमधली मुलं, बायका-म्हातारेकोतारे खोळंबलेत. एका तथाकथित नेत्याला त्याचे चमचे 'सर, तुमची गाडी दुसऱ्या रस्त्यानं काढायची व्यवस्था करतो', म्हणून सांगतायत. अशात एक छोटा शाळकरी मुलगा झाड ढकलायला पुढे सरसावतो. त्याला पाहून सगळे सरसावतात. झाड हटतं. वाहतूक सुरळीत होते. खऱ्या 'नेत्या'च्या पाठीवर शाबासकीची थाप पडते...
* सतत जातीपातींवरून भांडणाऱ्या गावचा तरणाबांड सरपंच आयडिया लढवतो. माणसांची नावंच त्यांची 'ओळख' सांगतात, हे लक्षात घेऊन तो फर्मान काढतो, आजपासून कोणालाही नाव नाही. मोबाइल नंबर हीच प्रत्येकाची आयडेण्टिटी. जातीपातीची भानगडच बाद...
* ... अशीच कुठेतरी बेंडबाजा वाजवत चाललेल्या वरातीला थांबवून 'हे हॉस्पिटल आहे, इथे आवाज करू नका' असं डायरेक्ट नवरदेवाला सांगणारी धैर्यशीला दिसते... कुठे अनाथाश्रमातल्या मुलांच्या डोक्यावरचं आसऱ्याचं छप्पर भक्कमपणे सांभाळणारी भिंत दिसते... कुठे कुणी मोबाइलच्या अलर्टवर 'लिफ्टमध्ये जीवनाची जोडीदार भेटेल' असं भविष्य वाचून दिवसभर लिफ्टमनच्या जोडीनं लिफ्टमध्ये बसलेला 'उपवधू' बाशिंगबाज दिसतो... कुठे मोबाइलच्या नादात रंगलेला बिल्लू बेटा बापाचं शिर उचलून निविर्कारपणे त्याच्या हाती ठेवतो... कुठे छोट्या शहरातून मोठा झालेल्या क्रिकेटपटूला आपल्या गावातले सगळे लहानथोर 'हेअरस्टाइल' करायला लागल्याचा साक्षात्कार होतो... कुठे म्हैस च्युइंगम चघळून (रेड्यांसाठी) 'आकर्षक' होते... कुठे च्युइंगममुळे शुभ्र झालेल्या दातांचा शहर-रस्ते-महाल उजळवणारा 'उजेड' पडतो...
टीव्हीच्या पडद्यावरून सतत हे अद्भुत मनोरंजन सुरू असतं...
... अतिशय कल्पकतेनं आणि प्रचंड मेहनतीनं बनवलेल्या, कितीतरी विषय आणि फॉर्म्स हाताळणाऱ्या, समाजातल्या बदलांवर अचूक बोट ठेवणाऱ्या, अभिनयाचे, संगीताचे, सौंदर्याचे, टेकिंगचे मानदंड निर्माण करणाऱ्या, एक सो एक जाहिराती नजर खिळवून ठेवतात...
... आणि जाहिरातींच्यामध्ये काय सुरू असतं?
सतत भरजरी साड्या घालून, मोठी कुंकवं लावून वावरणाऱ्या, प्रत्यक्षापेक्षा मनातच जास्त बोलणाऱ्या, कपटी, हिंस्त्र बायांच्या आणि नेभळ्या पुरुषांच्या कौटुंबिक सिरीयल.
सुपरस्टार शिंकला की त्याच्या लहानपणापासूनचे फोटो, पहिल्या सिनेमापासूनची गाणी आणि त्याला शिंक का आली असेल, यावर तज्ज्ञांची मतं दाखवणाऱ्या 'ब्रेकिंग न्यूज'.
कलावंतांना प्रेक्षकांकडे 'माझी जात, नाव, गाव, रंग रूप पाहून मला एसेमेसची भीक घाला हो' अशी आर्जवं करायला लावणारे स्पर्धात्मक 'रिअॅलिटी शो'...
... बा प्रेक्षका, जागा हो.
हीच वेळ आहे आपल्या हक्कांबद्दल जागरूक होऊन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे ही मागणी करण्याची की...
' आशयघन आणि कलात्मक जाहिरातींच्या मधले हे बिनडोक व्यत्यय ताबडतोब बंद करा!''

No comments:
Post a Comment