Tuesday, June 28, 2011

तो तिथे पोहोचलाय ना! (मेहमूद)


/photo.cms?msid=1147655 राजेंदकुमार , विश्वजीत , जॉय मुखजीर्

वगैरे तुळतुळीत , गुळगुळीत मंडळी एकदा देवाकडे गेली , म्हणाली , ' हे प्रभू , आम्ही हिंदी सिनेमात हीरो जसे हवे असतात तसे चिकणेचुपडे आहोत , गाणीगिणी , झाडांभोवती फेऱ्या वगैरे व्यवस्थित जमतात आम्हाला. पण , एकच वांधा आहे. अॅक्टिंग अॅक्टिंग म्हणतात ना , ते काही आपल्याला जमत नाही बुवा काही केल्या. आणि तेच येत नसेल , तर पब्लिक आमचा सिनेमा पाहायला कसं येईल ?' देव म्हणाला , ' वत्सांनो , ती चिंता सोडा. तुमच्या सोयीसाठी मी एक अजब वल्ली भूतलावर ऑलरेडी पाठवली आहे.  
 तुमच्या सिनेमांत तो सांेगाड्या जेवढा वेळ पडद्यावर दिसेल , तेवढा वेळ पब्लिक खुचीर्ला गोंद लावल्यासारखं चिकटून बसेल. आणि अधूनमधून तुम्ही दिसलात तरी खपवून घेईल... ' साक्षात परमेश्वरानंच दिलेला हा चालताबोलता ' वर ' सुमारे तीन दशकं हिंदी सिनेमाचा पडदा , थिएटरच्या भिंती , खुर्च्या वगैरे गदागदा हलवत राहिला , छप्पर उडवत राहिला आणि पडद्यावर त्याच्या अवतीभवती वावरणारी ही उपरोल्लेखित मंडळी ज्युबिली कुमार , मॅटिनी आयडॉल वगैरे बिरुदं मिरवत राहिली. 
 बॉक्स ऑफिसवरच्या बाजीत हे हीरो दुरीर्तिरीर्च्याही वकुबाचे नव्हते , तिथला खरा बादशहा होता मेहमूद! पब्लिक त्याच्या अत्यंत वांड , उनाड , उर्मट , वाह्यात , आचरट अशा लीला पाहायला थिएटरांत लोटायचं. असल्या सिनेमांत तो सहसा हीरोचा मित्र असायचा. शुभा खोटेवर डोरे टाकणारा. अत्रंग वागण्यानं भावी सासऱ्याची , धुमाळची खिट्टी सतत सटकवत ठेवणारा. आज यातल्या बऱ्याच सिनेमांची मूळ गोष्ट आठवत नाही , मेहमूद-शुभा खोटे-धुमाळ यांचा धुमाकूळ मात्र लख्ख आठवतो. 
 तेवढाच टिकून राहणार आहे.अतिशय सामान्य रंगरूपाचा हा इसम अंगात काहीतरी संचारल्या-सारखा पडद्यावर वावरायचा . अफलातून सोंगं काढायचा आणिे प्रेक्षकांना हमखास गाफील गाठायचा. आदल्या सिनेमात टाकलेली पाटी त्यानं सहसा (निदान तशीच्या तशी तरी) कधीच पुढच्या सिनेमात टाकली नाही. मेहमूद आता काय ' गंमत ' करणार , याची पब्लिकला उत्सुकता असायची. ती तो पूर्ण करायचाच......पण , प्रत्येक वराबरोबर एक शापही असतोच त्या वराला काटणारा. मेहमूदलाही तो होता. अंगात ठासून भरलेली , पाच-सात नायकांच्या तोडीची गुणवत्ता त्याला स्वस्थ बसू देईना. 
  नायकापेक्षा जास्त मानधन मिळवणारा मेहमूद भूमिकेच्या , सिनेमाच्या आकारमानापेक्षा मोठा होऊ लागला. निमिर्ती-दिग्दर्शनात उतरला. बेछूटपणाची जोड मिळाली आणि मेहमूद बेढब होत गेला... अंतर्बाह्य!या भस्मासुरानं स्वत:च्या डोक्यावर हात कधी ठेवला , हे त्याला कळलंच नाही. आणि मग हिंदी सिनेमाची तीन दशकं आपल्या ' इलेक्ट्रिक ' अस्तित्त्वानं सळसळवून सोडणाऱ्या ' त्या ' मेहमूदचं बेंगरूळ कलेवर बरोबर ऑक्सिजन मास्क बाळगत जगत राहिलं... ' त्या ' मेहमूदच्या नकलाबिकला करून पब्लिकला हाशिवन्याची केविलवाणी कसरत करत राहिलं आणि आजअखेरीला तेही अल्लादरबारी रुजू झालं......
 आकाशात गडगडतंय... ?... साहजिकच आहे... आपला मेहमूद तिथे पोहोचलाय ना!




(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment