Tuesday, June 28, 2011

आग' ठरेल की 'राख (रामगोपाल वर्मा की आग)

उंट आणि मुका असा एक दृष्टांत आहे... तदनुसार काही लोकांना अवघड गोष्टी करण्याचा छंदच असतो... काहींना तर कुणी कल्पनाही केली नसेल इतकं अचाट काहीतरी सुचत असतं. त्याचे दोन फायदे असतात. एकतर तुम्ही जे काही करताय त्याकडे सगळ्या गावाचं लक्ष आपसूक वेधलं जातं... फुकट आणि बक्कळ प्रसिद्धी. दुसरं म्हणजे , तुमचं अपयशही ग्लोरियस असतं... आणि यशस्वी झालात तर तुमची चांदीच.
/photo.cms?msid=2324431

संजय लीला भन्साळीनं
' देवदास ' चा रिमेक करून हा उंट-मुकावाला प्रकार केला होता. तो फसला असं समीक्षक मानतात. बॉक्स ऑफिसवरची छनछन हीच एकमात्र ' समीक्षा ' मानणारे गल्लाबहाद्दर मात्र आधीच्या ' देवदास ' पेक्षाही हाच देवदास ' सरस ' होता असंच मानणार.

रामगोपाल वर्मा ऊर्फ रामू यांनी तर सं. ली. भन्साळी यांच्याही पलीकडे झेप घेतलीये. भारतीय सिनेमातला नगाधिराज हिमालय त्यांनी पादाक्रांत करायला घेतलाय. साक्षात
' शोले ' ला हात लावण्याचं धाडस या पठ्ठ्यानं केलंय. ( ' शिवा ', ' सत्या ', ' रंगीला ', ' रात ' केले नसते , तरी केवळ एवढ्या एका गोष्टीसाठी रामूअण्णा हिंदी सिनेमाच्या इतिहासात अजरामर झाले असते.)

'
शोले ' हा केवळ सिनेमा नाहीये. ती एक दंतकथाच आहे हिंदी सिनेमाच्या क्षेत्रातली. भारताच्या जनमानसात तिला एखाद्या लोककथेचं स्थान आहे. गब्बर , जय , वीरू , ठाकूर ही सिनेमातली पात्रं नाही राहिलेली आता. ती वर्षानुवर्षं आजीच्या गोष्टींमधून किंवा भाषोभाषीच्या ' चांदोबां ' मधून सांगितल्या जाणाऱ्या गोष्टीतल्या ' सोमदत्त नामक गरीब ब्राह्माणा ' इतकीच भावविश्वात रुजून गेली आहेत.

अशा या अफाट उंचीच्या सिनेमाचा रिमेक करण्याची कल्पना करणंही अचाट. ते रामूनं केलं. मूळ
' शोले ' मधल्या गब्बरच्या रोलवर डोळा असलेल्या अमिताभला ' बब्बन ' या नावानं गब्बर बनायची संधी देऊन त्यानं हुकमी उतारी केली. संजीवकुमारच्या जागी मोहनलाल ही योजनाही अगदीच र्फस्टक्लास. पण...

पण... मेक अप
, लायटिंगच्या साह्यानं खूँख्वार जनावरासारखा बनवण्यात आलेला अमिताभचा बब्बन (प्रोमोजमध्ये तरी) तंबाखू मळणाऱ्या , पारोश्या गब्बरसिंगइतका खतरनाक वाटत नाही... ... आणि ' शोले ' हे सिनेमाचं नाव ज्याच्या डोळ्यांतल्या खदिरांगारांवरून घेतलंय , त्या संजीवकुमारच्या डोळ्यामधली आग मोहनलालच्या नजरेत दिसत नाही...
/photo.cms?msid=2324434

बाकी वीरूच्या भूमिकेत (हल्ली केस वगैरे रंगवून हडकलेल्या कोंबड्यासारखा दिसू लागलेला) अजय देवगण
, जय म्हणून रामूचा कुणी एक (मोहित अहलावट , रणदीप हूडा या रामूच्या इतर पंटरांप्रमाणेच दगडी चेहऱ्याचा) नवोदित पंटर , बसंतीच्या जागी पटरपटर करायला फुटकळ निशा कोठारी , जया भादुरीच्या जागी सुश्मिता... या गोष्टी तर चचेर्च्या पलीकडच्याच आहेत.

रामूला चर्चेत राहण्याची कला जशी साध्य झालीये तसंच
, त्याआधीपासून सिनेमाचं दृश्यतंत्र आत्मसात झालंय. सीनमध्ये काही आशयात्मक दम असो नसो ; रामूचं टेकिंग प्रेक्षकाला खुचीर्ला बांधून ठेवतं. हिंदी सिनेमाचं नाटकी डायलॉगबाजीचं जोखड भिरकावून देऊन मिनिमम संवादांसह तो सीन्स किती इफेक्टिव करू शकतो , हे ' सरकार ' मध्ये दिसलं होतंच. पण , हा तंत्राधिष्ठित अप्रोच ' शोले ' सारख्या कथाप्रधान , प्रसंगनाट्यप्रधान सिनेमाच्या रिमेकला लागू होईल का ? ' शोले ' चं मूळ अपीलच त्याच्या होलसम कथानकात आणि शब्दप्रधानतेत होतं. (त्याला रमेश सिप्पींच्या तांत्रिक हुकुमतीची जोड होतीच. पण , हा विरळा योग होता.) रामूचा ' टेकिंग ' चा हव्यास ' शोले ' तल्या ' आगी ' वर बादल्या बादल्या पाणी ओतू शकतो...

...
ही ' आग ' आहे की ' राख ' ते आज कळेलच. पण , एरवी वंद्य वजनदार असलेला रामू ' शोले ' पुढच्या तागडीत बराच हलका आहे... अजून तरी!

/photo.cms?msid=2327505

No comments:

Post a Comment