सुधेंदु रॉय हे नाव ऐकलंयत तुम्ही?
करेक्ट! 'मधुमती'पासून 'इंग्लिश बाबू देसी मेम'पर्यंत असंख्य सिनेमांचे नामांकित कलादिग्दर्शक सुधेंदु रॉय... त्यांच्या नावावर एक अनोखा विक्रम आहे... त्यांचे (म्हणजे त्यांनी दिग्दशिर्त केलेले) दोन सिनेमे भारतातफेर् ऑस्करसाठी पाठवले गेले आहेत... 'उपहार' आणि 'सौदागर'...
... सुधेंदु रॉय यांच्या मालिकेत आणखी दोन दिग्दर्शकांचा समावेश होतो. मणिरत्नम ('अंजली' आणि 'नायकन') आणि शंकर ('इंडियन' आणि 'जीन्स'). या पंक्तीत यंदाच आणखी एका नावाची भर पडलीये... विधू विनोद चोप्रा... त्याचा 'परिंदा' ऑस्करसाठी पाठवला गेला होता आणि यंदा त्याच्या 'एकलव्य'च्या गळ्यात ही वरमाला पडली आहे... अमिताभ, संजय दत्त, सैफ अशी बडी नावं असतानाही बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटी खाल्लेल्या आणि समीक्षकांनीही तुफान झोडलेल्या 'एकलव्य'मध्ये ज्युरी मंडळाला एकदम ऑस्करपात्र गुणवत्ता कशी काय सापडली, हा सार्वत्रिक कुतूहलाचा विषय आहे. फिल्म इंडस्ट्रीतल्या अनेकांनी या चॉइसबद्दल आश्चर्य व्यक्त केलंय. 'एकलव्य'च्या स्पधेर्त असलेल्या 'धर्म' या सिनेमाच्या टीमने तर ज्युरींवर पक्षपाताचा आरोप करून 'एकलव्य'ला कोर्टात खेचलंय. पण, त्याआधीच 'एकलव्य'ची रिळं अमेरिकेत पोहोचली आहेत. विधू विनोद आता सुधेंदु, मणिरत्नम, शंकर यांच्या मांडीला मांडी लावून बसायला मोकळे झाले आहेत...
भारतातफेर् 'ऑस्कर'साठी पाठवला जाणारा सिनेमा हा बाय डिफॉल्ट त्या वर्षातला भारताचा सवोर्त्तम सिनेमा असायला हवा. तसं शेजारच्या चौकटीतल्या यादीवर नजर टाकल्यावर वाटतं का? ऑस्करवारीच्या दुहेरी मानकऱ्यांच्या पंगतीत सत्यजित राय, श्याम बेनेगल यांच्यातलं कुणीही नाही. अदूर गोपालकृष्णन, मृणाल सेन, गिरीश कासारवल्ली, मृणाल सेन, ऋत्विक घटक, जी. अरविंदन, शाजी करूण, गिरीश कर्नाड, एम. टी. वासुदेवन नायर, बी. व्ही. कारंथ, जानू बारुआ, गोविंद निहलानी, अपर्णा सेन, बुद्धदेव दासगुप्ता आणि आपले जब्बार पटेल यांना तर एकेका एन्ट्रीचाही मान कधी लाभलेला नाही. भारतीय सिनेमातले माइलस्टोन्स म्हणून गणले गेलेले कित्येक प्रादेशिक आणि हिंदी सिनेमे या यादीत नाहीत. 'पायल की झंकार', 'सागर', 'हीना', 'रूदाली', 'जीन्स', 'इंडियन', 'हे राम' हे आपले क्लासिक्स आहेत?
आजवर ऑस्करसाठी भारतातफेर् पाठवल्या गेलेल्या सिनेमांच्या यादीतून स्पष्टपणे दिसतो तो सिनेमा निवडणाऱ्यांचा गोंधळ. वर्षाला हजाराहून अधिक सिनेमे तयार करणाऱ्या या देशातून नेमका कोणता सिनेमा ऑस्करसाठी पाठवायचा, याची टोटल कुणालाच लागत नाही. आता हा सगळा सरकारी मामला. खरंतर खासगी निर्माताही स्वत:च्या बळावर ऑस्करच्या परदेशी चित्रपट विभागाच्या स्पधेर्त दाखल होऊ शकतो. पण आपल्याकडे फिल्म फेडरेशन आणि माहिती प्रसारण खात्यानं निवडलेला सिनेमा हीच अधिकृत एन्ट्री मानली जाते. आता हेच सरकार आणि त्यांचं हेच खातं दरसाल चित्रपटांसाठीचे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करतं. त्यात देशभरातल्या सर्व भाषांमधल्या उत्तम कलाकृती गौरवल्या जातात. त्यांच्यातली सवोर्त्तम कलाकृती सुवर्णकमळाची मानकरी ठरते. म्हणजे सुवर्णकमळविजेता सिनेमा हा आपसूकच त्या वर्षातला देशातला सवोर्त्कृष्ट सिनेमा ठरतो. मग सरकार सरळ त्या सिनेमाची एन्ट्री का पाठवत नाही ऑस्करला, हे एक कोडंच आहे.
आजवर ऑस्करला पाठवल्या गेलेल्या सिनेमांमध्ये हिंदी सिनेमांची संख्या सर्वाधिक आहे. हिंदी ही मेनस्ट्रीम सिनेमाची भाषा आहे, तिचा प्रेक्षकवर्ग सर्वाधिक आहे, या भाषेतही आशय-विषय-मांडणीचे प्रयोग करणारे निर्माते-दिग्दर्शक पैदा होऊ लागले आहेत, हे सगळं खरं. पण, तरीही हिंदी ही मूलत: भारतीय सिनेमातल्या सरमिसळ गल्ल्याची, आटपाटनगरातल्या रसाळ पण काल्पनिक कहाण्यांचीच भाषा राहिली आहे. भारतीय मातीचा खरा गंध तिच्यात फार कमी वेळा दरवळलाय. भारतीय सिनेमाकलेच्या श्रेष्ठतेचे मानदंड ठरतील, अशा हिंदीतल्या कलाकृतींची संख्या किती? (आपल्याला मराठीव्यतिरिक्त फक्त हिंदी सिनेमाच ठाऊक असतो, त्यामुळे आपल्या 'ज्ञाना'वर विसंबू नका.)
आपल्या राष्ट्रीय पुरस्कारांचंच उदाहरण घेऊ. दरसाल या पुरस्कारांमध्ये सर्वाधिक पारितोषिकं पटकावण्यात आघाडीवर असतात ते मल्याळी आणि बंगाली सिनेमे. इंडियन पॅनोरमाच्या चित्ररत्नांच्या दरबारात हिंदी सिनेमाचा रुतबा जेमतेम पंचहजारी मनसबदाराचाच राहिला आहे वर्षानुवर्षं. अशा 'दरिदी' भाषेतले सिनेमे ऑस्करला का गेले वर्षानुवर्षं? हिंदीतले त्या त्या वषीर्चे सवोर्त्तम सिनेमे निवडले गेलेत, असंही नाही.
खरंतर ऑस्कर आपण अगदी अलीकडेपर्यंत कधी सिरियसली घेतलंच नाही. आपल्या पहिल्याच एन्ट्रीनं (मदर इंडिया) ऑस्करच्या अंतिम स्पधेर्त धडक मारल्यानंतरही आपण गाफील राहिलो. आपल्याला तशी गरजही भासली नाही. आपली इंडस्ट्री ही 'जगात सर्वाधिक सिनेमे बनवणारी फिल्म इंडस्ट्री'. आता ही ओळख म्हणजे 'टिंबक्टू हा जगात सर्वाधिक आंबे पिकवणारा देश आहे,' इतकी फुटकळ ओळख झाली- खरी ओळख असते 'हापूस'चा देश असण्यात. पण, मुळात भारतीय सिनेमाला जागतिक महत्त्वाकांक्षाच नव्हती. पुढे कर्तबगार भारतीयांनी परदेशांत धडक मारून जगभरात मिनी गुजरात, मिनी पंजाब, मिनी केरळ तयार केले ('मिनी भारत' म्हणणं फार धाडसी होईल). या सगळ्यांच्या मनोरंजनाच्यागरजांचा 'मसावि' म्हणजे हिंदी सिनेमा. तो परदेशांत व्यवस्थित रिलीज करून डॉलर-पौंडात पैसे कमावण्याची आयडिया (अर्थातच) चोप्रांच्या डोक्यात आली आणि मग ग्लोबल इंडियाची छनछनाटी ताकद गरीब बिच्चाऱ्या भारताला उमगू लागली. हॉलिवुडपटांचं प्राबल्य असलेल्या अखिल जगताच्या टेरिटरीत शिरकाव करायचा, तर ऑस्करसारखा जागतिक मान्यतेचा शिक्का उमटायला हवा, यासाठी आत्ता कुठे भारतीय सिनेमा सिरीयसली प्रयत्न करायला लागलाय. ऑस्करसाठी पाठवायला निवड झालेल्या सिनेमांचे निर्माते-दिग्दर्शक लगेच इमाने इतबारे आमिर खान, आशुतोष गोवारीकरांची शिकवणी लावतात लॉबिइंगसाठी. न जाणो आपला मटका लागला तर! (ऑस्करची निवडपद्धत आणि तिथल्या ज्युरींचं भारत आणि भारतीय सिनेमाबद्दलचं 'ज्ञान' लक्षात घेता, लागेल तेव्हा तो 'मटका'च असण्याची शक्यता जास्त आहे.)
विदेशी सिनेमासाठीचं ऑस्कर भारतीय सिनेमाला मिळवण्याबद्दल आपण सजग झालो खरे; पण त्यामुळे गुंता वाढतच चाललाय.
कोणता सिनेमा पाठवायचा ऑस्करला?
भारताचा सिनेमा अशी काही एकसंध ओळख आहे का?
हिंदी सिनेमानं रूढ केलेला 'मसालापट' हीच एकमात्र 'भारतीय मनोरंजक' सिनेमाची ओळख आहे. प्रादेशिक भाषांमधला निव्वळ मनोरंजक सिनेमाही त्याच मसाल्यातून बनतो. कुठे थोडं आलं जास्त, कुठे थोडा मिरचीचा झणका अधिक. पण, सिनेमाकलेमधली भारताची प्रगती दाखवणारे, त्या कलेला खास भारतीय टच देणारे सिनेमे मात्र प्रांताप्रांतात वेगवेगळ्या शैली घेऊन अवतरतात. लेखात सुरुवातीला उल्लेखलेल्या मल्याळी, कन्नड, बंगाली आणि अन्य भाषिक दिग्दर्शकांच्या कलाकृती आठवून पाहा. त्यांच्यातली एखादी कलाकृती भारतासाठी 'ऑस्कर' नसती आणू शकली?
पण, 'हा सिनेमा युरोपियन, अमेरिकन सिनेमाकडून प्रेरणा घेणारा आहे', 'ही स्टाइल हॉलिवुडवाल्यांच्या परिचयाची आहे', 'या सिनेमात भारतातल्या दारिद्याचं दर्शन घडतं', असली कारणं देऊन आपण हा सिनेमा पाठवला नाही. त्यापेक्षा खऱ्या भारताशी संबंध नसलेला हवेतला हिंदी मसाला सिनेमा पाठवून आपल्या अकलेच्या दारिद्याचं दर्शन घडवणं श्रेयस्कर मानलं आपल्या निवडर्कत्यांनी.
मसाला सिनेमा हीच आपली 'ओळख' मानून 'हीना', 'जीन्स', 'इंडियन'सारखे सिनेमे पाठवले गेले. हिंदी व्यावसायिकपटाचा फॉरमॅट (गाणी, नाट्य, प्रेम, थरार वगैरे होलसम पॅकेज) वापरून उत्कृष्ट 'कथाकथन' करणारा 'लगान' एखादवषीर्च गवसला आपल्याला. कधी भारतीय सिनेमातला सगळा चकचकाट पाहून (तरी) ऑस्करच्या परीक्षकांचे डोळे दिपतील, या विचारानं आपण बंगाली सेन्सिबिलिटीची कथा गुजराती भडकपणानं मांडणारा 'देवदास' (अर्थातच नवा) ऑस्करवारी करून येतो. कधी भारतात अत्यंत नाविन्यपूर्ण असलेल्या शैलीत तरुण पिढीची कहाणी सांगू पाहणारा 'रंग दे बसंती' पाठवला जातो. कधी पाश्चात्यांच्या परिचयाचा 'साधू आणि रोप ट्रिक'वाला मिस्टिकल, एक्झॉटिक भारतच पाठवून पाहूयात ('पहेली', 'एकलव्य') असं गणित मांडलं जातं.
आणि मग गणित कसंही मांडा... उत्तर शून्य येतं.
कारण अस्सल सिनेमाची अशी गणितं मांडता येत नाहीत.
किंबहुना फिल्ममेकिंगची, जॉन्र, शैलीची गणितं डोक्यात ठेवून समोर बसलेल्या प्रेक्षकाला त्या सगळ्या गणितांचा कम्प्लीट विसर पाडून आपल्यामध्ये पार बुडवून टाकणाऱ्या सिनेमाचीच अशा स्पधेर्त सरशी होते...
... असा सिनेमा भारतात बनत नाही का?
बनतोच ना, निश्चितच बनतो. फक्त कोणतीही गणितं मांडत न बसता सिनेमाचा दर्जा हा एकच निकष ठेवून त्या आधारावर सिनेमा निवडण्याची धमक ज्युरींनी दाखवायला हवी.
साल चित्रपट दिग्दर्शक
१९५३ मदर इंडिया................ मेहबूब खान
१९६२ साहिब बिवी और गुलाम....अब्रार अल्वी
१९६९ दैवमागन............ ए. सी. त्रिलोकचंदर
१९७१ रेश्मा और शेरा..............सुनील दत्त
१९७२ उपहार...................... सुधेंदु रॉय
१९७३ सौदागर..................... सुधेंदु रॉय
१९७४ गर्म हवा..................एम. एस. सथ्यु
१९७७ मंथन श्याम बेनेगल
१९७८ शतरंज के खिलाडी सत्यजित राय
१९८० पायल की झंकार सत्येन बोस
१९८४ सारांश महेश भट
१९८५ सागर रमेश सिप्पी
१९८६ स्वाती मुथ्थयम के. विश्वनाथ
१९८७ नायकन मणिरत्नम
१९८८ सलाम बाँबे मीरा नायर
१९८९ परिंदा विधू विनोद चोप्रा
१९९० अंजली मणिरत्नम
१९९१ हीना रणधीर कपूर
१९९२ थेवर मगन भारतन
१९९३ रूदाली कल्पना लाझमी
१९९४ बँडिट क्वीन शेखर कपूर
१९९५ कुरुथी पुनाल पी. सी. श्रीराम
१९९६ इंडियन शंकर
१९९७ गुरू राजीव अंचल
१९९८ जीन्स शंकर
१९९९ दि अर्थ दीपा मेहता
२००० हे राम कमलहासन
२००१ लगान आशुतोष गोवारीकर
२००२ देवदास संजय लीला भन्साळी
२००४ श्वास संदीप सावंत
२००५ पहेली अमोल पालेकर
२००६ रंग दे बसंती राकेश ओमप्रकाश मेहरा
२००७ एकलव्य द रॉयल गार्ड विधू विनोद चोप्रा

No comments:
Post a Comment