tag:blogger.com,1999:blog-8817386527026938472.post6546273397156428357..comments2023-08-06T12:54:36.596-07:00Comments on मायाबाजार: बॅड बॉय...(सलमान खान)मुकेश माचकरhttp://www.blogger.com/profile/01034795545808812044noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-8817386527026938472.post-9353522409763783312011-02-15T06:42:29.876-08:002011-02-15T06:42:29.876-08:00अभिनयाचा गंध नसतानाही सलमान खानला प्रचंड प्रसिद्धी...अभिनयाचा गंध नसतानाही सलमान खानला प्रचंड प्रसिद्धी मिळतेय. (खरं तर असे कित्येक अभिनेते-नेत्री आहेत की त्यांना लाथा घालून हाकलून द्यायला पाहीजे. पण, ते आपल्या हातात नाही.) संजय दत्तला बाँबस्फोटात आरोपी ठरवलं तरी, मुन्नाभाई ऍमबीबीऍस आणि लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटातून त्याचं चारित्र्य उजाळण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न चांगलाच यशस्वी ठरला. यावरून भारतीय प्रेक्षकांनी या हिरोंना किती डोक्यावर घेतलंय हेच दिसून येतं. बॅड बॉय बरोबरच बॅड बायसुद्धा आहेत.. ऍकीकडं परदेशात पॅरिस हिल्टन सारख्या बड्या हस्तीला रॅश ड्राईव्हींग केल्यामुळं शिक्षा आणि दंड भोगावा लागतो. दुसरीकडं भारतात रेल्वेचं तिकीट न काढलं म्हणून हेमा मालिनीला पकडला असता, तिच्या सुटकेसाठी नेते-अभिनेते यंत्रणा हलवून टाकतात. त्यानंतर, त्या टीसीला हेमा मालिनीची माफीही मागावी लागते. भारतात क्रिकेटर आणि अभिनेत्यांना दैवत्व बहाल झालंय. मूळात दिग्दर्शकांनी भारतीय प्रेक्षकांना कधी शहाणचं होऊ दिलं नाही. आणि भारतीय प्रेक्षकही १००-१५० (मल्टीप्लेक्स असेल तर, ३००-४०० रुपये) रुपयांत आपली अक्कल गहाण ठेवून चित्रपटात दाखवलेलं जशास तसं स्विकारतात. ज्या अजय देवगणला गुटखा खाल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला. जो चैन स्मोकर आहे, त्यालाच मुंबई पोलिस सजग मुंबईकर आणि धुम्रपानमुक्त मुंबई असा संदेश देण्यासाठी ब्रँड अम्बेसेडर बनवते. या अभियानाच्या लाँचींगला आयपीऍस अधिकारीही त्याच्या मागे-पुढे करत होते. (ही हुजरेगिरी पोलिस-अभिनेत्यांच्या अडी-अडीचणींनाही उपयोगी पडतं) तेव्हा, देव (खरं तर माझा देवावर विश्वास नाही. पण, लोकांच्या विश्वासावर माझा विश्वास आहे.) अक्कल वाटत असताना, पोलिस आयुक्त संजीव दयाळ यांच्यासह ईतर अधिकारी फुगडी खेळायला गेले होते काय, असा प्रश्न माझ्यासारख्या सामान्याच्या मनात पडतो. तुमचा लेख खूपच छान आहे.. आवडला.. धन्यवाद.ramrajehttps://www.blogger.com/profile/03108461435104511305noreply@blogger.com